Sanjay Raut: खासदार संजय राऊत पुन्हा अडचणीत; बीडमध्ये गुन्हा दाखल | पुढारी

Sanjay Raut: खासदार संजय राऊत पुन्हा अडचणीत; बीडमध्ये गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे नेहमीच राजकीय वादाचे धनी ठरत असतात. राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना जबाबदार धरले होते. यानंतर राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, गृहमंत्री अमित शहा आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहित सुरक्षेची मागणी केली होती. यानंतर त्यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्यावर बीड येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांच्यावर भादंवि 211,153(A), 500,501,504 आणि 505(2) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.  पुढील तपास सुरू असल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे, असे एएनआयने म्हटले आहे.

संजय राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. ठाण्यातील एका जामीनावर सुटलेल्या राजा ठाकूर या गुंडाला मला मारण्याची सुपारी दिल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तसेच यानंतर राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहले. राऊतांच्या या पत्रानंतर  चांगलीच खळबळ उडाली आहे. याची दखल घेत, राऊत यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.

Back to top button