व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांना का आडवता? संभाजीराजे छत्रपती नाराज | पुढारी

व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांना का आडवता? संभाजीराजे छत्रपती नाराज

पुढारी ऑनलाईन: आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव साजरा होत आहे. दरम्यान व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांना थांबवण्यात आल्याचा आरोप करत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावर व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांना का आडवता? असा थेट प्रश्न भर कार्यक्रमातच संभाजीराजे यांनी उपस्थित केला. तसेच व्यवस्थापणावर जोरदार टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्याचा सर्वांना समान अधिकार आहे. मग दुजाभाव का केला जातोय. आम्ही किती सहन कराचे? असे प्रश्न विचारत संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच शिवभक्तांच्या व्यथा मांडल्या.

दरम्यान, संभाजीराजे यांच्या व्यथा लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ याची दखल देत पुढील वर्षी होणा-या शिवजयंतीवेळी असे घडणार नसल्याचे अश्वासन दिले.

Back to top button