उद्धव ठाकरे यांच्यासमोर तीन पर्याय… | पुढारी

उद्धव ठाकरे यांच्यासमोर तीन पर्याय...

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  1)  उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल चिन्ह कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरण्यास परवानगी आहे. त्यानंतर ते वापरता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळविणे हा पहिला पर्याय उद्धव ठाकरे तपासणार आहेत.

2) सर्वोच्च न्यायालयाने २ स्थगितीचा दिलासा दिला नाहीतर गेली ५६ वर्षे ठाकरे कुटुंबाकडे असलेला शिवसेनेचा वारसाही संपुष्टात येईल. हा वारसा विसरून उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष काढणे आणि नवीन चिन्ह मिळविणे याशिवाय अन्य पर्याय नसेल.

3) नव्या पक्षाचा निर्णय तातडीने घ्यावा लागेल. शिंदे गटाला आयोगाने शिवसेना व धनुष्यबाणाचा ताबा दिल्याने लवकरच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचाही बिगुल फुंकला जाऊ शकतो. पक्ष आणि चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे यांना जास्त वेळ न देण्याची भाजप आणि शिंदे गटाची रणनीती असू शकते.

Back to top button