नवे राज्यपाल रमेश बैस यांचा उद्या शपथविधी | पुढारी

नवे राज्यपाल रमेश बैस यांचा उद्या शपथविधी

मुंबई : नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी सायंकाळी मुंबईत दाखल होत आहेत. शनिवारी, 18 तारखेला दुपारी ते राजभवनातील दरबार हॉल येथे समारंभपूर्वक शपथ घेणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा देण्यात आली आहे. बैस हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांचा नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास राहिला आहे. ते सातवेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. शिवाय त्यांनी केंद्रात विविध खात्याचा कारभार सांभाळला आहे.

Back to top button