Stock Market Today : आजचा दिवस ‘रेड झोन’चा! जाणून घ्या बाजारात काय घडले?

Stock Market Today : आजचा दिवस ‘रेड झोन’चा! जाणून घ्या बाजारात काय घडले?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market Today : भारतीय बाजाराचा आठवड्याचा शेवट नकारात्मक लाल दिव्यांनी बंद झाला. सेन्सेक्स, निफ्टी दोन्हीही घसरले. तर बँक निफ्टी संघर्ष करत काही अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्स हे सर्वाधिक नफा मिळवणारे ठरले. एलआयसीचे आजच्या बाजारात सर्वोत्तम योगदान ठरले.तर एचसीएल टेक, हिंदाल्को टॉप लॉसर्स राहिले. याशिवाय टाटा स्टील, इन्फोसिस, विप्रो आणि टेक महिंद्रा यांना नुकसान झाले आहे. तसेच कालपर्यंत चांगली कामगिरी करणा-या झोमॅटो, पे टीएमचे शेअर्स ही घसरले. बाजार बंद होताना सेन्सेक्स 100 अंकांनी खाली आला तर निफ्टी 17850 च्या खाली राहिले.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज पुन्हा नकारात्मक लाल निर्देशांकानी झाली. गुरुवारी संघर्ष केल्यानंतर भारतीय बाजाराच्या आजच्या दिवसाची सुरुवात देखील नकारात्मक झाली. अवघ्या तासाभरात निफ्टी 17850 च्या खाली आला तर सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला. त्यानंतर बाजाराची खालच्या दिशेने वाटचाल सुरूच राहिली.

Stock Market Today : एलआयसी टाटा मोटर्सचे, शेअर्स प्रत्येकी 2 टक्क्यांनी वाढले

भारतीय आयुर्विमा कॉर्पोरेशन (LIC) चे शेअर्स 2.55% वाढून 629.00 रुपयांवर पोहोचले आहेत, ज्यानंतर एकत्रित निव्वळ नफ्यात 40 पटीने वाढ झाली आहे. त्यातच एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांच्या सकारात्मक स्टेटमेंटचा देखील प्रभाव एलआयसीच्या शेअर्सवर पाहायला मिळाला. कुमार यांनी शेअरहोल्डर्स, पॉलिसीधारकांना अदानी ग्रुपच्या विमा कंपनीच्या एक्सपोजरबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. याशिवाय टाटा मोटर्सचे शेअर्सही 2 टक्क्यांनी वधारले.

Stock Market Today : झोमॅटो-पेटीएमचे शेअर्सही घसरले

सकाळी बाजार उघडल्यानंतर निव्वळ तोटा पाच पटीने वाढल्यानंतर झोमॅटोचा शेअर 4% खाली आले. सकाळी झोमॅटोचे शेअर्स 4.41% घसरून रु. 52.00 वर आले. त्यानंतर सातत्याने झॉमॅटोच्या समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली. झोमॅटोचे शेअर्स आज सकाळच्या व्यवहारात 7% पेक्षा जास्त घसरले. आज इंट्रा डे व्यवहारात झोमॅटोचे शेअर्स 50.35 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

तर गेल्या दोन दिवसांपासून उत्तम परफॉर्म करणा-या पेटीएमचे शेअर्स देखील आज सकाळपासूनच घसरले होते. पूर्ण दिवसभर पे टीएमच्या समभागांची तीच परिस्थिती राहिली.

Stock Market Today : बँक निफ्टी संघर्ष करत किरकोळ वाढला

गुरुवार पासून सुरू असलेली बँक निफ्टीची घसरण अजूनही कायम आहे. सकाळच्या सत्रात बँक निफ्टी 60.35 अंक किंवा 0.15% घसरून 41,493.95 वर आला. निर्देशांकात सर्वाधिक लाभधारक AU बँक, बँक ऑफ बडोदा, PNB, Axis बँक आणि कोटक बँक आहेत. तर ICICI बँक, IDFC फर्स्ट बँक, IndusInd बँक, SBIN आणि HDFC बँक तोट्यात आहेत. तर दिवसभराच्या संघर्षानंतर बँक निफ्टीत किरकोळ अंकांनी वाढ नोंदवली.

MSCI च्या फ्लोट कटिंगनंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

MSCI च्या घोषणेनंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली. MSCI ने Adani Enterprises Ltd., Adani Transmission Ltd., Adani Total Gas Ltd., and ACC Ltd. च्या फ्री फ्लोटमध्ये बदल करण्याची आपली योजना जाहीर केली आहे. हे बदल 28 फेब्रुवारी रोजी लागू केले जातील. परिणामी अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले.

बाजार बंद होताना…

बाजार बंद होताना शेवटच्या सत्रात, सेन्सेक्स 100 अंकांपर्यंत खाली आला. तर NSE निफ्टी 50 50.85 पॉइंट्स किंवा 0.28% घसरून 17,842.60 वर ट्रेड करत होता. एकूणच भारतीय बाजाराचा आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस संघर्षमय नकारात्मक लाल दिव्यांनी सुरू होऊन लाल छायेतच बंद झाला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news