आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवे आव्हान; म्हणाले, अधिवेशनापूर्वी... | पुढारी

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवे आव्हान; म्हणाले, अधिवेशनापूर्वी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक आव्हान दिले आहे. माझ्यासोबत लढायच नसेल तर येत्या अधिवेशनात राज्यपालांचे भाषण होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना बदलून दाखवावं, असे त्यांनी म्हटले आहे. जालना येथे आज (दि८) माध्यमांशी ते बोलत होते.

वरळी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आयते मिळालेल्यांनी मला आव्हान देऊ नये. असली छोटी आव्हाने मी स्वीकारत नाही. येत्या महापालिका निवडणुकीत एखाद्या वार्डात उभे रहा, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना वरळीतील कार्यक्रमात सुनावले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझ्या सोबत वॉर्डमध्ये लढणार असतील तर तिथेही लढू असे म्हणत आणखी एक आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांना वरळीतून लढण्याचे आव्हान दिले होते. यावर त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यानंतर ठाण्यातून लढवून दाखवा तिथे मी यायला तयार असल्याचे सांगितलं होतं. पण त्यांना माझ्यासोबत लढायच नसेल तर मी पुन्हा एक चॅलेंज देत आहे. येत्या अधिवेशनात राज्यपालांचे भाषण होण्यापूर्वी त्यांनी राज्यपालांना बदलून दाखवावं. राज्यपालांनी महाराष्ट्राचा आणि महापुरूषांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विषयांसाठी दिल्लीत आवाज उठविणे गरजेचे आहे. पण ते दिल्लीला स्वत:साठी जातात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

 

Back to top button