हीन राजकारणासाठी सत्‍तेचा वापर केल्‍यास जनता पाठ फिरवते : संजय राऊत | पुढारी

हीन राजकारणासाठी सत्‍तेचा वापर केल्‍यास जनता पाठ फिरवते : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल (मंगळवार) वरळीत सभा होती. या कार्यक्रमाकडे वरळीच्या जनतेने पाठ फिरवली. अनेक लोक सभा सुरू असतानाच उठून जात होते. कोळी बांधव हे मुळचे मुंबईचे आहेत आणि हे सर्व कोळीवाडे मुळ शिवसेनेसोबत ठाम आहेत, अशी भूमीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्‍त केली.

हीन राजकारणासाठी सत्‍तेचा वापर केल्‍यास जनता पाठ फिरवते हे कोळीवाड्यातल्‍या मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून दिसून आले. त्‍यामुळे मुख्यमंत्रीपदी विरोधक बसले असले तरी त्‍या पदाचा अवमान होउ नये याची त्‍या पदी बसलेल्‍या व्यक्‍तीने काळजी घ्‍यावी असे ते म्‍हणाले.
मंगळवारी (दि.०८) औरंगाबादमधील महालगाव येथेआदित्य  ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान वाद झाला होता. त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. यावर बोलताना राऊत यांनी आदित्‍य ठाकरे यांच्या कार्यक्रमात घडलेला हा प्रकार दुर्देवी आहे. सरकारने यापुढे आदित्‍य ठाकरे यांच्या सुरक्षेची काळजी घ्‍यावी, अशी भूमीका मांडली.

काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी घेतलेल्‍या भूमीकेवर बोलताना त्‍यांनी काँग्रेस हा महाविकास आघाडीमधला महत्‍वाचा घटक आहे. बाळासाहेब थोरातांना मी ओळखतो. त्‍यांच्या नसानसात काँग्रेस आहे अस ते म्‍हणाले.

दरम्‍यान भाजपवर टीका करताना बाहेरून आलेले लोक घेउनच भाजप उभा आहे. मुळ विचारांचा भाजप कुठे आहे असा प्रश्न विचारत कार्यकर्ते उभारणारी भाजपची यंत्रणाच बंद झाल्‍याची टीका राऊत यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button