विधान परिषद निवडणुकीपूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता! थोरात यांना विखे-पाटलांचा सल्ला | पुढारी

विधान परिषद निवडणुकीपूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता! थोरात यांना विखे-पाटलांचा सल्ला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज होऊन विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देणारे बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषद निवडणुकीपूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, असा खोचक सल्ला थोरात यांचे राजकीय विरोधक आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे.

विखे म्हणाले, थोरात यांचे हे सोयीचे राजकारण आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना मदत केली नाही, तेव्हाच त्यांनी का राजीनामा दिला नाही. पक्षांतर्गत अडचण असल्याचे सांगत राजीनामा देणार्‍यांनी आपल्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाला सांगणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आपण आजारी असल्याचे सांगून प्रचाराच्या दिवसात ते घरात थांबले. मग आता कशासाठी राजीनामा देत आहेत, असा सवाल विखे यांनी उपस्थित केला.

Back to top button