“बाळासाहेब आमच्यासोबत बोलतच नाहीत” थोरात यांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया | पुढारी

"बाळासाहेब आमच्यासोबत बोलतच नाहीत" थोरात यांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : “बाळासाहेब आमच्यासोबत बोलतच नाहीत. माझा त्यांच्याशी संपर्क नाही. हायकमांड या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे. अखेरचा निर्णय हायकमांड घेतील. पक्षाने दिलेले काम मी करत आहे. त्यामुळे या सगळ्या राजकारणाकडे मला लक्ष द्यायच नाही,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर दिली. यावेळी थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या. आज (दि.७) माध्यमांशी ते बोलत होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघात भाचा सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने अडचणीत आलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी, आपण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत काम करू शकत नाही, असे पत्र काँग्रेस हाय कमांड सोनिया गांधी यांना लिहिल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचवेळी थोरात यांनी बाळासाहेब आमच्यासोबत बोलतच नाहीत. माझा त्यांच्याशी संपर्क नाही, असे म्हटले आहे. कार्यकारणीची बैठक तीन महिन्यांनी घ्यायची असते. मागच्या महिन्यात प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली होती. पोटनिवडणुकीच्या रणनीतीसाठी १५ तारखेला कार्यकारणीची बैठक बोलावली असल्याचे पटोले यांनी सांगितले. बाळासाहेबांचा वाढदिवस आहे एवढच मला माहिती आहे. कोण काय राजकारण करतय याच्यात मला पडायच नाही, असही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

 

Back to top button