कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक : पहिल्या फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर | पुढारी

कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक : पहिल्या फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकण शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर आहेत. म्हात्रे यांनी सहा हजार मतांची आघाडी घेत पहिल्या फेरीत एकूण 22 हजार मते मिळवली आहेत. त्यांना 60 टक्के तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 40 टक्के मतदान मिळाले. आतापर्यंतच्या मतमोजणीत दोन हजार मते अवैध ठरली आहेत.

नवी मुंबईत नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे मतमोजणी सुरू आहे. एकूण 28 टेबलवर मतमोजणी होत आहे. महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील (शेकाप) आणि भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत होत आहे. भाजपने म्हात्रे यांच्यासाठी चांगलीच कंबर कसली होती. पहिल्या फेरीत म्हात्रे आघाडीवर राहिले आहेत. म्हात्रे यांना 23 संघटनांनी पाठिंबा दिला होता. दोन केंद्रीय मंत्री, चार खासदार आणि आमदार त्यांच्यासाठी मैदानात उतरले होते. पहिल्या फेरीत त्यांना 20 हजार 800 मते मिळाली आहे.

 

 

Back to top button