Bombay HC: उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका

पुढारी ऑनलाईन : उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ आणि केंद्रीय कायदा मंत्री किरन रिजिजू यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने ही याचिका दाखल केली आहे.या दोघांनाही पदावरून काढण्याची मागणी, या याचिकेतून करण्यात आली आहे.
PIL filed before Bombay High Court against Vice President, Law Minister for their remarks against judiciary, Collegium
report by @Neha_Jozie #bombayhighcourt @VPIndia @KirenRijiju https://t.co/p0dbb1T6rR
— Bar & Bench (@barandbench) February 1, 2023
याचिकेत म्हटलं आहे की, “उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ आणि केंद्रीय कायदा मंत्री किरन रिजिजू या दोघांची न्याय व्यवस्थेबाबतची अलिकडची काही विधाने भारतीय राज्यघटनेवरील अविश्वास दाखवतात. त्यांच्या या विधानातून त्यांचा संविधानावरील विश्वासाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे या प्रकरणी दोघांनाही अपात्र ठरवत, त्यांना त्यांच्या अधिकृत कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यात यावे.”
हेही वाचा:
- Mohan Bhagwat : किल्ले हे आपली स्फूर्ती स्थाने- सरसंघचालक मोहन भागवत
- Stock Market Today | शेअर बाजार पुन्हा अस्थिर, अदानींच्या शेअर्समध्ये घसरण कायम
- नाशिक : मतमोजणी सुरु, ‘मतदारांचा कौल माझ्याच बाजूने’; शुभांगी पाटील यांचा निकालाआधीच विजयाचा दावा