यूटीएस अ‍ॅपवर फर्स्ट क्लास, एसी लोकलचे तिकीट; एका तिकिटावर करता येणार ४ प्रवाशांना प्रवास | पुढारी

यूटीएस अ‍ॅपवर फर्स्ट क्लास, एसी लोकलचे तिकीट; एका तिकिटावर करता येणार ४ प्रवाशांना प्रवास

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना आता युटीएस अ‍ॅपवरून फस्ट क्लास आणि एसी लोकलचे तिकिट काढता येणार आहे. एका तिकिटावर चार प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. त्यामुळे तिकिट खिडकीवरील रांगा कमी होण्यास मदत होईल. शिवाय प्रवासी रेल्वे स्थानकापासून १० किलोमीटरच्या अंतरापर्यत आता लोकलचे तिकिट काढू शकतात.

तिकिट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यूटीएस अ‍ॅप सेवेत आणले. नोव्हेंबर महिन्यात अ‍ॅप अद्ययावत केल्याने रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटर परिसरातून लोकल तिकीट घेणे शक्य झाले. मात्र फस्ट क्लास आणि एसी लोकलची एकावेळी अनेक तिकिटे घेण्याची प्रवाशांना सुविधा मिळाली नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वेविरोधात नाराजी पसरली होती. त्यानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी युटीएस पवरुन एकाच वेळी अनेक तिकिटे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयाने रेल्वे सूचना प्रणाली केंद्राला पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने १९ जानेवारीपासून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

रेल्वेने १० जानेवारीपासून उपनगरीय रेल्वेचे तिकिट १० किमी तर गैर-उपनगरीय रेल्वेचे तिकिट २० किलोमीटरच्या अंतरापर्यंत काढण्याची मुभा दिली आहे. याशिवाय १९ जानेवारीपासून अ‍ॅपच्या माध्यमातून फस्ट क्लास आणि एसी लोकलच्या एका तिकिटावर ४ प्रवाशांचे तिकिट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकत्र फिरायला जाणाऱ्यांना फायदा होणार आहे. याशिवाय युटीएस अ‍ॅप हे इंग्रजीसह मराठी आणि हिंदीत देखील उपलब्ध करण्यात

Back to top button