मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौर्‍यावर 40 कोटींचा खर्च : आदित्य ठाकरे | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौर्‍यावर 40 कोटींचा खर्च : आदित्य ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्‍यातील खर्चावरून शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी टीकेची झोड उठवली. अवघ्या चार दिवसांच्या दावोस दौर्‍यावर 35 ते 40 कोटींचा खर्च करण्यात आला. या दौर्‍यासाठी विशेष विमान वापरूनही मुख्यमंत्री दावोस येथील आर्थिक परिषदेला उशिरा पोहोचल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईतील 400 किलोमीटर रस्ते काँक्रीटीकरणाच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत महापालिकेत आमची सत्ता आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला. दावोस येथील आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेतून सुमारे दीड लाख कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. गुंतवणुकीचे हे दावे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

Back to top button