राज्यपाल आम्हालाच सांगत होते ‘मुझे जाने का है’; आता त्यांच्या विनंतीचा विचार करावा : जयंत पाटील | पुढारी

राज्यपाल आम्हालाच सांगत होते 'मुझे जाने का है'; आता त्यांच्या विनंतीचा विचार करावा : जयंत पाटील

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल यापूर्वी आम्हालाच सांगत होते, मुझे जाने का है… आता त्यांनी लेखी विनंती केली आहे. तर केंद्र सरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मधल्या काळात राज्यपालांनी जी वक्तव्ये केली, ती बघता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता राज्यपालांनीच इच्छा व्यक्त केली आहे. असेही जयंत पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या काही प्रोसिजर बाबी असतील किंवा त्यांना नवीन राज्यपाल रिप्लेस करण्यासाठी माणूस मिळाला नसेल, असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. २३) येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button