Preeti Sharma Menon : जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच पंतप्रधानांचा मुंबई दौरा – प्रीती शर्मा मेनन | पुढारी

Preeti Sharma Menon : जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच पंतप्रधानांचा मुंबई दौरा - प्रीती शर्मा मेनन

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : यावर्षी सुमारे ७,५०० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि ते जिंकणार नाहीत. म्हणून आपले अपयश लपविण्यासाठी आणि जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठीच शिंदे-फडणवीस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईमध्ये बोलविण्याचा घाट घातला आहे. जेणेकरून नरेंद्र मोदी यांच्या खोट्या प्रसिद्धीचा फायदा शिंदे- फडणवीस सरकारला आगामी निवडणुकांमध्ये व्हावा. यासाठी मोदी यांना मुंबईत यावे लागत आहे, अशा शब्दांत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन (Preeti Sharma Menon) यांनी राज्‍य सरकारवर ताशेरे ओढले.

या वेळी प्रीती शर्मा मेनन (Preeti Sharma Menon) म्हणाल्या की, गुरुवारी (दि. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबईतील मेट्रोसेवा बंद ठेवली जाणार आहे. उदघाटनस्थळी जाणारे सर्व रस्ते व वांद्रे सांताक्रूझ विभागातील सर्व रस्ते दुपारी १२ ते रात्री उशिरापर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यासाठी नोटिसा देखील पाठविण्यात आलेल्या आहेत. माझा शिंदे -फडणवीस सरकार व स्थानिक पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना का ? पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस का धरले जात आहे? हा सर्वसामान्य मुंबईकर जनतेवर अन्याय आहे आणि याचा जितका निषेध करावा, तितका थोडा आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रामध्ये कोणाचीही सहानुभूती मिळणार नाही. शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. अशा परिस्थितीमधे जर राज्यात आणि मुंबईत निवडणुका झाल्या तर आपला पराभव निश्चित आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. म्हणून त्यांनी सर्व आगामी निवडणुका थांबवून ठेवल्या आहेत, असा आरोपही प्रीती शर्मा मेनन यांनी केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button