यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चिअरगर्ल्स आणल्या आता हे.. नीलेश राणेंची रोहित पवारांवर बोचरी टीका | पुढारी

यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चिअरगर्ल्स आणल्या आता हे.. नीलेश राणेंची रोहित पवारांवर बोचरी टीका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरगर्ल्स आणल्या, आता हे महाशय काय आणतात बघूया,अशी बोचरी टीका करत माजी खा. नीलेश राणे यांनी रोहित पवार यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित यांची निवड झाल्यानंतर नीलेश राणे यांनी हे ट्विट केले आहे.

पवार कुटुंबीयांवर नेहमीच टीकेच्या तोफा डागणार्‍या नीलेश यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद पवार यांचे नातू आ. रोहित यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे अभिनंदन. मात्र, अध्यक्षपदी निवड होण्यामागे क्रिकेटमध्ये त्यांचे नेमके योगदान काय हे समजले नाही. यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरगर्ल्स आणल्या. आता हे महाशय काय आणतायत बघूया.

Back to top button