

पुढारी ऑनलाईन डेस्क : सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेत खासदार संजय राऊत यांनी सुचक ट्विट केले आहे. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, नशीब बदललं नाही तरी वेळ नक्की बदलते, असे ट्विट राऊत यांनी केले आहे.
ठाकरे आणि शिंदे सत्तासंघर्षावर (Maharashtra political crisis) आज महत्त्वाची सुनावणी आज मंगळवारी (दि.१०) दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या खंडपीठाकडे ही सुनावणी होणार की सात जणांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपविले जाणार, याचा फैसला या सुनावणीत घेतला जाणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावरील न्यायालयीन सुनावणीत २०१६ सालच्या अरुणाचल प्रदेशातील नाम राबिया प्रकरणाचा संदर्भ वारंवार दिला जातो. या प्रकरणातील सुनावणी पाच जणांच्या घटनापीठापुढे झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी त्यापेक्षा मोठ्या म्हणजेच सात जणांच्या घटनापीठापुढे करावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने मागच्या सुनावणीत केली होती.
यानंतर सध्याच्या न्यायालयीन लढ्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद करायचा, याबाबत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे म्हणणे मांडावे, असे निर्देश घटनापीठाने मागील सुनावणीत दिले होते. यानंतर राज्यातील सत्तासंघर्षावर होणाऱ्या आजच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. (Maharashtra political crisis)
हेही वाचा :