मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एसटी बस धावणार की नाही ? एसटी महामंडळाने दिली महत्त्वाची माहिती | पुढारी

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एसटी बस धावणार की नाही ? एसटी महामंडळाने दिली महत्त्वाची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून जाणाऱ्या एसटी गाड्या बंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून सुद्धा एसटीच्या गाड्या धावणार आहेत. यासंदर्भात एसटी महामंडळाने पत्र काढून माहिती दिली.
मुंबईहून पुणे व महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जाण्यासाठी बोरघाटातून नवीन मुंबई-पुणे एक्सप्रेस वे व जुना मुंबई-पुणे महामार्ग हे दोन मार्ग आहेत. एसटी महामंडळाच्या बहुतांश बसेस मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून दररोज धावत असतात.

त्यापैकी काही बस गाड्यांना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून (खोपोली-लोणावळा-तळेगाव मार्गे) जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या बस त्या मार्गाने न जाता मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून धावतात, असे एसटी प्रशासनाच्या निर्देशनास आले. म्हणून केवळ या मोजक्याच बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आलेल्या आहेत. शिवनेरीसह मुंबई-सातारा, बोरीवली- सातारा या मार्गावरून धावणाऱ्या शिवशाही बस गाड्यांसह अन्य बस नेहमीप्रमाणे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून धावत आहेत.

Back to top button