पुढारी ऑनलाइन डेस्क : शिंदे गटात अजून काही गट निर्माण झाले आहेत आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे. मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षणाची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या गटाचे वैफल्य आहे, अशी टीका आज ( दि. २) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
या वेळी राऊत म्हणाले की, "शिंदे गटाचे अजून काही गट निर्माण झाले आहेत आणि तेथे टोळी युद्ध सुरू आहे, अशी माहिती आहे. रविवारीच ( दि. १ ) अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय की, माझ्या गटातील लोकचं 'माझा करेक्ट कार्यक्रम करतायत'. यावरून काय सुरू आहे, हे तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या. त्यांच्या गटामध्ये काय घालमेल सुरू आहे, काय हालचाली सुरू आहेत, कसे वाद सुरू आहेत हे समजून घ्या."
मी वारंवार सांगत आहे, हे सरकार टिकणार नाही आणि हा गटही टिकणार नाहीत. यातील निम्म्यापेक्षा जास्त लोक भाजप स्वतःला विलिन करून घेतील. तेच त्यांच अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना शिवसेना परत स्वीकारणार नाही. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षणाची केलेली भाषा हे त्यांच्या गटाचं वैफल्य आहे. त्यामुळेच केसरकर म्हणतात की, एकत्र येऊया, असा टोलाही त्यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदार अपात्र ठरतील. कायदेशीर दृष्टीनं आमची बाजू भक्कम आहे, असा विश्वासही राऊत यांनी या वेळी व्यक्त केला.
हेही वाचा :