पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या आठवड्यात दहा सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Mcap) १ लाख ३५ हजार ७९४ कोटींनी वाढ झाली आहे. बाजार भांडवलात सर्वाधिक वाढ झालेल्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात ३० शेअर्सचा बीएसई निर्देशांक ९९९.४५ अंकांनी म्हणजेच १.६६ टक्क्यांनी वाढला.
१० कंपन्यांच्या यादीत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि भारती एअरटेल पिछाडीवर राहिले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल ३५,०२९.१ कोटी रुपयांनी वाढून ५,४७,२५७.१९ कोटी रुपयांवर पोहोचले. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल (mcap) ३१,५६८.०८ कोटींनी वाढून १७,२३,९७९.४५ कोटींवर गेले आहे. अदानी एंटरप्रायजेसचे भांडवल २४,८९८ कोटींनी वाढून ४,३९,९६६.३३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल १६,५३५.०८ कोटींनी वाढून ९,०७,५०५.४१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
टाटा कन्सल्टन्सीचे बाजार भांडवल ११,६९० कोटींनी वाढून ११,९२,५७६.३२ कोटी रुपयांवर तर आयसीआयसीआय बँकेच्या बाजार भांडवलात ८,२२१ कोटींनी वाढ झाली आहे. यामुळे या बँकेच्या एम कॅपने ६,२१,५८८ कोटी रुपयांवर झेप घेतली आहे. इन्फोसिसचे मार्केट कॅप ४,६९२ कोटींनी वाढून ६,३४,८७३ कोटींवर, एचडीएफसीचे एम कॅप ३,१५८ कोटींनी वाढून ४,८१,४३७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
दरम्यान, हिंदुस्तान युनिलिव्हरच्या बाजार भांडवलात घट झाली आहे. या कंपनीचे भांडवल १४,१२१ कोटी रुपयांनी कमी होऊन ६,०१,४३६ कोटींवर आले आहे. तर भारती एअरटेलचे एम कॅप ८९० कोटींनी कमी होऊन ४,४८,९७७ कोटींवर आले आहे.
टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी, भारती एअरटेल आणि अदानी एंटरप्रायजेस यांच्या पाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ही सर्वात मूल्यवान कंपनी राहिली आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूकदार गेल्या वर्षभरात १६.३८ लाख कोटींहून अधिक श्रीमंत झाले आहेत. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल वर्षभरात १६ लाख ३८ हजार ०३६ कोटींवरून २ कोटी ८२ लाख ३८ हजार २४७ कोटींवर पोहोचले आहे.
हे ही वाचा :