मुंबई : गोरेगाव चर्चगेट लोकल सलग तीन दिवस बंद; प्रवाशांची गैरसोय | पुढारी

मुंबई : गोरेगाव चर्चगेट लोकल सलग तीन दिवस बंद; प्रवाशांची गैरसोय

मालाड; पुढारी वृत्तसेवा :  गोरेगाव चर्च गेट सकाळी ९: ५३ ची लोकल सलग तीन दिवस रद्द केल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. यासह अनेकांना लोकलअभावी कामावर पोहचण्यास विलंब होत असल्याने पगार कपातीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाबाबत प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर उमटला आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता गोरेगाव चर्चगेट ही लोकल २७ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली. यामुळे चाकरमानी प्रवाशांसह विद्यार्थी व महिला प्रवासी वर्गाची तारांबळ उडाली आहे. काहींना कामावर वेळेत पोहचता येत नसल्याने त्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कपात करण्यात आला आहे. यामुळे आर्थिक भुर्दंडाला तोंड द्यावे लागत आहे. सलग तीन दिवस अचानकपणे लोकल रद्द केल्याने सर्वांचे वेळेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले गेले असून, लोकलने अधिकतर व्यवसायिक प्रवास करत असल्याने त्यांनाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यामुळे संतप्त प्रवाशी वर्गाने रेल्वे प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

 हेही वाचा :

Back to top button