Maharashtra Winter Session 2022 : ‘५० खोके एकदम ओके’…विधीमंडळाबाहेर विरोधकांची घोषणाबाजी (व्हिडिओ) | पुढारी

Maharashtra Winter Session 2022 : '५० खोके एकदम ओके'...विधीमंडळाबाहेर विरोधकांची घोषणाबाजी (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (दि. १९,सोमवार) सुरु झालं आहे.  विधिमंडळाबाहेर विरोधी पक्षाकडून कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय… शिंदे सरकार हाय हाय… गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… ५० खोके एकदम ओके… खोके सरकार काय म्हणतंय,गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय… शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक…मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला. (Maharashtra Winter Session 2022)

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात विरोधी पक्षांनी सरकारचा निषेध करत केली. विधिमंडळ सभागृहांच्‍या पायऱ्यांवरच विरोधी पक्षांच्‍या आमदारांनी “५० खोके एकदम ओके”, ईडी सरकार हाय हाय, अशा जोरदार घोषणा देण्‍या सुरुवात केली. यानंतर माध्‍यमाशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सभागृहात सीमाप्रश्नावर कोण वातावरण खराब करतय यावर सरकारने बोलावे. सरकारने प्राधान्‍याने विदर्भातील शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नांना न्‍याय द्‍यावा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

Maharashtra Winter Session 2022: सत्तांतरानंतर पहिलेच अधिवेशन

राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यादाच हे अधिवेशन होत असल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे 22 आणि 23 डिसेंबर पक्ष मजबुतीच्या दृष्टीने नियुक्ती पत्र प्रदान करणार आहेत. गेल्या दौऱ्यात त्यांनी कार्यकारिणी बरखास्त केली होती. अधिवेशनामुळे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना कामाला लागले आहेत. महापालिका निवडणुका असल्याने राजकीय पक्षांचे शक्ती प्रदर्शन यावेळी जोरात पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Winter Session 2022
Maharashtra Winter Session 2022

 

 

हेही वाचा : 

Back to top button