जीवनात नेहमीच आपल्याला हव्या तशा घटना घडत नाहीत; तुकाराम मुंढे | पुढारी

जीवनात नेहमीच आपल्याला हव्या तशा घटना घडत नाहीत; तुकाराम मुंढे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या प्रशासनात आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे रविवारी आपल्या सूचक ट्विटमुळे चर्चेचा विषय ठरले. अवघ्या दोन महिन्यात त्यांना कुटुंब कल्याण पदावरून हटविल्यानंतर मुंढे सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत घटना घडतील, असे होत नाही, अशा आशयाचे सूचक ट्विट करत मुंढे यांनी आपली नाराजी उघड केल्याचे मानले जात आहे.

जीवनात नेहमी सर्वत्र चर्चा आपल्याला हव्या तशाच राज्य सरकारने चार दिवसांपूर्वी विविध सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात मुंढे यांच्याही बदलीचे आदेश निघाले. विशेष म्हणजे अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी त्यांना आरोग्य विभागात आयुक्त, कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावर नियुक्त करण्यात आले होते. राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांना सोपविण्यात आला होता. दोन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची आरोग्य विभागातून उचलबांगडी करण्यात आली.

Back to top button