मागील अडीच वर्षात केवळ अडीच तास उद्धव ठाकरे मंत्रालयातील खुर्चीवर बसले : नारायण राणे | पुढारी

मागील अडीच वर्षात केवळ अडीच तास उद्धव ठाकरे मंत्रालयातील खुर्चीवर बसले : नारायण राणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर एक चकार शब्द काढलेला नाही. कारण ते हिंदुत्व सोडून काँग्रेससोबत गेले आहेत. आंदोलन आणि ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. मागील अडीच वर्षात ठाकरे केवळ मंत्रालयातील खुर्चीवर केवळ अडीच तास बसले, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज (दि.२९) पत्रकार परिषदेत केली.

भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आदित्य ठाकरे सहभागी झाले होते; परंतु राहुल गांधी आदित्य ठाकरे यांना मिठी मारून परत गेले. भारत जोडो यात्रेदरम्यान आयोजित केलेल्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल टीका केली होती. सावरकरांनी ब्रिटीशांकडे माफीनामा दिला होता, असे त्यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या विधानाविरोधात भाजप, मनसेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. परंतु, ठाकरे याबाबत काही बोलले का ? ठाकरे यांना सावरकरांबद्दल सन्मान आहे का ? असा सवालही राणे यांनी या वेळी केला.

मागील अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले आहेत. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर उद्योग बाहेर गेल्याची ओरड विरोधकांकडून सुरू झाली आहे. त्यांच्या राजवटीत उद्योग बाहेर गेले, आता चार महिन्यात उद्योग बाहेर गेल्याचे बोलू लागले आहेत. मागील अडीच वर्षात किती उद्योग बाहेर गेले यावर कुणी बोलत नाही. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावे कर्नाटकात जाणार असल्याच्या चर्चावर महाराष्ट्रातील एक इंचही जागा कुठे जाणार नाही, असेही राणे यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button