jihad : पैशांसाठी नव्हे, जिहादसाठी आमचा लढा, एटीएस सुत्रांकडून माहिती

नवी दिल्ली ः पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील लोधी रोड पोलिस ठाण्यात त्यांना कडक बंदोबस्तात आणण्यात आले.
नवी दिल्ली ः पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील लोधी रोड पोलिस ठाण्यात त्यांना कडक बंदोबस्तात आणण्यात आले.
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि उत्तर प्रदेश दहशतवादीविरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईमध्ये पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादी कारवायांतून सहभागी असलेल्या सहा जणांनी अटकेनंतर खळबळजनक माहिती बाहेर आली आहे. दाऊद इब्राहिम वा अन्य कुणाकडूनही पैसे मिळविण्यासाठी नव्हे तर इस्लामच्या 'जिहाद' (jihad) या तत्त्वासाठी आम्ही हे सगळे करत होतो, असे या दहशतवाद्यांनी चौकशीदरम्यान सांगितल्याचे एटीएसमधील सूत्रांनी सांगितले. (We were doing this not for money but for the Islamic principle of 'jihad'," ATS sources said during interrogation)

चार दहशतवाद्यांना मध्यरात्रीनंतर दिल्लीत एका न्यायाधीशांच्या घरीच हजर करण्यात आले. दहशतवाद्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जान मोहम्मद शेख (47, मुंबई, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (22, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (47, रायबरेली), झिशान कमर (28, अलाहाबाद), मोहम्मद अबू बकर (23, बहराईच), मोहम्मद अमीर जावेद (31, लखनौ) हे सहा जण अटकेत आहेत, यापैकी झिशान आणि ओसामाला बुधवारी न्यायालयासमोर आणण्यात आले.

दोघांना (ओसामा ऊर्फ सामी व झिशान कमर) पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्त वार्ता विभागाने प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे.

दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना हाताशी धरून 'आयएसआय'ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सणासुदीच्या काळात हल्ल्यांचा कट रचला होता.

गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानके, मोठी मंदिरे, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीदरम्यान प्रचारसभांची मैदाने आदी ठिकाणांची रेकी त्यासाठी या दहशतवाद्यांनी केली होती.

झिशान आणि ओसामा यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, आम्हाला पैशाचा मोह नव्हता. फक्त जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला जाऊन लढण्याचे व विध्वंसाचे प्रशिक्षण घेतले.

आम्ही तेथे एका फार्म हाऊसमध्ये राहात होतो.

16 बंगाली भाषिकांचा शोध

पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले 16 बंगाली भाषिक पश्चिम बंगालमध्ये लपून आहेत. त्यांचा शोध एटीएसकडून सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news