कोण देणार १ लाख २१ हजार रोजगार? | पुढारी

कोण देणार १ लाख २१ हजार रोजगार?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील 1 लाख 21 हजार तरुणांना कॉर्पोरेट संस्थांमध्ये रोजगार मिळावा म्हणून राज्यातील 44 नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सीज्समवेत बुधवारी सामंजस्य करार करण्यात आले. कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे करार झाले. हे करार करणार्‍या कंपन्या कोणत्या, त्या किती रोजगार देणार आहेत, यावर दै. ‘पुढारी’ने टाकलेली ही एक नजर…

या करारांमुळे बेरोजगार युवक, युवतींसाठी आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), मीडिया अँड एंटरटेन्मेंट, बांधकाम, रिटेल, बँकिंग, एव्हिएशन इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये दहावी पास, नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी इत्यादी पात्र उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अर्थात, या सामंजस्य करारांची अंमलबजावणी झाली; तरच हे शक्य होईल.

रोजगार

नोकर्‍या घेणार्‍यांबरोबरच नोकर्‍या देणारे हातदेखील निर्माण करावे, असे स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत असत. आज 1 लाख 21 हजार बेरोजगारांना नोकर्‍या देण्याचा संकल्प आपण केला आहे. शासनातही 75 हजार नोकर्‍या देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येत्या वर्षभरात 1 हजार कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येतील. त्यामुळे ग्रामीण युवकांना रोजगारासाठी शहरांमध्ये येण्याची गरज
राहणार नाही.
– मंगलप्रभात लोढा,
कौशल्य विकासमंत्री

Back to top button