कृषी अभ्यासक्रमाच्या 377 जागा वाढल्या; राज्यात पाच नवीन महाविद्यालये सुरू

कृषी अभ्यासक्रमाच्या 377 जागा वाढल्या; राज्यात पाच नवीन महाविद्यालये सुरू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कृषी अभ्यासक्रमाचे चार तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे एक असे पाच नवीन महाविद्यालये यंदा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या 377 नव्या जागा वाढल्या असल्या तरी कृषी शिक्षणातील अन्य अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये घट झाल्याने प्रत्यक्षात कृषी शिक्षणाच्या केवळ 156 जागाच वाढल्या आहेत.

कृषी अभ्यासक्रमाचे तीन अनुदानित तर एक विनाअनुदानित असे चार नवे महाविद्यालय सुरू करण्यात आल्याने 377 जागा वाढल्या आहेत. तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे एक नवे सरकारी महाविद्यालय सुरू करण्यात आल्याने 60 जागा वाढल्या. मात्र त्याचवेळी विनाअनुदानित महाविद्यालयातील तुकड्या कमी झाल्याने 120 जागा कमी झाल्या. त्यामुळे नवे महाविद्यालय सुरू झाले तरी गतवर्षीच्या तुलनेत 60 जागा कमी झाल्या आहेत.

2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये 201 महाविद्यालयांमध्ये 17 हजार 770 जागा होत्या. 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये या सर्व अभ्यासक्रमांना मिळून राज्यामध्ये 203 महाविद्यालयांमध्ये 17 हजार 926 जागा आहेत. यामध्ये 47 शासकीय तर 156 खासगी महाविद्यालये आहेत. शासकीय महाविद्यालयांमध्ये 3 हजार 686 जागा तर खासगी महाविद्यालयांमध्ये 14 हजार 240 इतक्या जागा आहेत.

यंदा या वाढलेल्या जागामुळे कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होईल. यासंदर्भातील अधिसूचना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे सीईटी सेलचे कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news