

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सांताक्रुझमध्ये एका क्लिन अप मार्शलला गाडीच्या बोनटवर फरपट नेण्याची घटना ताजी असतांना आता विलेपार्लेतील जुहू परिसरात क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करताना ही मारामारी झाल्याचे समजते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
येथील जुहू परिसरात काही नागरिक तोंडाला मास्क न लावता फिरत होते. यावेळी मास्क न लावता नागरिक फिरत असल्यामुळे क्लिनअप मार्शलने त्यांना अवडले. तसेच कारवाई म्हणून त्यांना दंड देण्यास सांगितले.
मात्र तो न देण्यास नागरिकांनी नकार दिल्याने उपस्थित नागरिक आणि मार्शल यांच्यात वाद झाला. पुढे या वादाचे रुपांतर नंतर भांडणात झाले.