सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याला तब्बल लाखाची रोकड स्वीकारताना अटक

सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याला तब्बल लाखाची रोकड स्वीकारताना अटक
Published on
Updated on

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याला एक लाखाची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडत त्याला अटक केली. यापूर्वी कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेचा कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज, त्यानंतर कल्याणचा तहसीलदार दीपक आकडे आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याला लाच स्विकारताना अटक झाली आहे.

या अभियंत्याने बांधकामांचे मुल्यमापन केल्यानंतर त्याचा अहवाल देण्याच्या मोबदल्यात एका ग्रामस्थाकडून आधी ४ लाख रुपये उकळून होते. त्यानंतर त्याने पुन्हा पैशांसाठी तगादा लावला. त्यानंतर या लाचखोर अधिकाऱ्याला कल्याणच्या पिडब्ल्यूच्या कार्यालयात सापळा लावून अटक करण्यात आली. कार्यालयातच अटक झाल्यामुळे कल्याण – डोंबिवलीत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

अविनाश पांडुरंग भानुशाली ( ५७ ) असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कल्याण शाखेत शाखा अभियंता ( वर्ग – २) पदावर कार्यरत आहे.

मुंबई – वडोदरा द्रुतगती महामार्ग भूसंपादनात खाबूगिरी

सद्या मुंबई – वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादनाच्या कामाला शासनाने वेग दिला आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात असून त्यामुळे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये या प्रकल्पाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात एकीकडे शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्याकरिता खाबूगिरीची लत लागलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. कल्याण – मुरबाड रोडला असलेल्या रायते गावातील एका ग्रामस्थाने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या ग्रामस्थाच्या मालकीच्या जमीनीवर केलेले बांधकाम मुंबई – वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादननात जात आहे.

या बांधकामांचे मुल्यमापन केल्यानंतर त्याचा अहवाल देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अविनाश भानुशाली याने पैश्यांची मागणी केल्यानंतर काही रक्कमही या ग्रामस्थाकडून उकळली. लाचविरोधी पोलिसांनी गुरुवारी ९ सप्टेंबर रोजी केलेल्या तांत्रिक पडताळणीदरम्यान यापूर्वी शाखा अभियंता भानुशाली याने ४ लाख स्विकारल्याली असल्याचे आढळून आले. त्यानंतरही त्याने या ग्रामस्थाकडे १ लाखांसाठी तगादा लावला होता.

आणखी १ लाख रुपये दिल्याशिवाय अहवाल मिळणार नाही, असे ब्लॅकमेल करणाऱ्या अभियंता भानुशाली याने या ग्रामस्थाला धमकावले. पैशांसाठी तगादा लावणाऱ्या या अधिकाऱ्याच्या विरोधात त्रस्त ग्रामस्थाने तक्रार दाखल केली. अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कल्याणच्या सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयात सोमवारी दुपारी लावलेल्या सापळ्यात ग्रामस्थाकडून १ लाखांची लाच स्विकारताना शाखा अभियंता अविनाश भानुशाली याला रंगेहाथ पकडले.

लाचविरोधी पोलिसांनी अचानक टाकलेल्या रेडनंतर सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी स्थानिक महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news