मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत | पुढारी

मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रनेत बिघाड झाल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले. सकाळी ऐन पीक अवर मध्येच लोकलची वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशाचे हाल झाले.

आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अंधेरी स्थानकात अप आणि डाउन जलद मार्गावरील सिग्नल यंत्रनेत बिघाड झाला. त्यामुळे चर्चगेट आणि विरारकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली. सकाळी गर्दीच्या वेळेसच हा बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. यावेळी रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी साडे आठ वाजण्याच्या सुमारास सिग्नल बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर लोकलची वाहतूक सुरु करण्यात आली, परंतु गाड्यांचे बंचिंग झाल्याने लोकल उशिराने धावल्या.

मध्य रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी दरम्यानची लोकल वाहतूक देखील 10 मिनिटे विलंबाने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा :  

Back to top button