अमृता फडणवीस यांनी नाकारली पोलीस सुरक्षा; म्हणाल्या, ‘मी सामान्य नागरिक’ | पुढारी

अमृता फडणवीस यांनी नाकारली पोलीस सुरक्षा; म्हणाल्या, ‘मी सामान्य नागरिक’

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी त्यांना गृहखात्याकडून देण्यात आलेली पोलिस सुरक्षा नाकारली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये मी सामन्य नागरिक असून मला तसेच जगायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली व यासाठीच त्यांनी पोलिस सुरक्षा नाकारत असल्याचे सांगितले आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांच्याच खात्याकडून देण्यात आलेली सुरक्षा अमृता फडणवीस यांनी नाकारली आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, मी सामान्य नागरिक आहे, मला मुंबईची सामान्य नागरिक म्हणून जगण्याची इच्छा आहे. माझी मुंबई पोलिसांनी विनंती आहे की, मला ट्रॅफिक क्लिरअन्स पायलट व्हेइकल देऊ नका. मुंबईतील वाहतुकीची अवस्था अत्यंत त्रासदायी आहे. पण, मला खात्री आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इन्फास्ट्रक्चर आणि विकासाच्या प्रकल्पाद्वारे मुंबईच्या त्रासापासून लवकरच सुटका मिळेल.

सामान्य नागरिक म्हणून अमृता फडणवीस यांनी व्हीआयपी कल्चरमधून बाहेर पडून सामान्य नागरिकांप्रमाणे जनतेत मिसळून राहू इच्छितात. त्यामुळे मोठ्या अदबीने आणि सौजन्यतेने त्यांनी त्यांना मिळणारी सुरक्षा नाकारली आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार अमृता फडणवीस यांना ‘व्हाय प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय गृहखात्याकडून घेतला होता. या पुर्वी शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या नेत्यांना असणारी सुरक्षा काढून घेतली होती.


अधिक वाचा :

Back to top button