Stock Market | गुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सने पार केला ६१ हजारांचा टप्पा

Stock Market | गुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सने पार केला ६१ हजारांचा टप्पा
Published on
Updated on

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) तेजी कायम राहिली. मंगळवारी सेन्सेक्सने ६१ हजारांवर व्यवहार केला. निफ्टीही वधारुन १८ हजारांवर गेला. अमेरिकन बाजारातील तेजी आणि आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. तसेच सोमवारच्या मजबूत विदेशी फंड खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स ६१ हजारांवर पोहोचला आहे. सेन्सेक्सची ही १० महिन्यांतील उच्च पातळी आहे. जूनच्या मध्यावधीला सेन्सेक्स ५१ हजारांवर होता. तो आता ९ हजार अंकांनी वाढून ६१ हजांरावर गेला आहे. सेन्सेक्स आज ३७४ अंकांनी वाढून ६१, १२१ वर बंद झाला. तर निफ्टी १३३ अंकांनी वाढून १८,१४५ वर बंद झाला.

सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३६५ अंकांनी वाढला होता. तर निफ्टी सुमारे १०० अंकांनी वधारला होता. बाजार बंद होताना ही तेजी कायम राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात Nykaa चे शेअर्स ६ टक्क्यांनी ‍वधारले तर Tata Steel चे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरले होते. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, डॉ. रेड्डीज लॅब्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अपोलो हॉस्पिटल्स हे निफ्टीवरील प्रमुख लाभधारक होते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी वाढून ८२.७१ वर बंद झाला.

HDFC बँक लिमिटेच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या सत्रात वाढ

निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.३ टक्के पर्यंत वाढले. दरम्यान, निफ्टी मेटल इंडेक्स वगळता निफ्टी बँक आणि निफ्टी फार्मा निर्देशांक जवळपास १ टक्क्यापर्यंत वाढल्याने सर्व क्षेत्र हिरव्या रंगात व्यवहार करत होते. HDFC बँक लिमिटेच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या सत्रात वाढ झाली आहे. हे शेअर २.२७ टक्क्याने वाढले.

आशियाई बाजारातून सकारात्मक संकेत

आशियाई बाजारातील सकारात्मक संकेत आणि या आठवड्यात होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही निर्देशांक मंगळवारी वधारले. रिलायन्स, बँकिंग आणि आयटी शेअर्स तेजीत राहिले. निफ्टीवरील IT कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात होते. टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीस, टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये प्रामुख्याने वाढ दिसून आली. (Stock Market)

नफ्यात घट, टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी घसरण

टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये मंगळवारी ३ टक्क्यांनी घसरण झाली. टाटा स्टीलचा सप्टेंबर तिमाहीतील एकत्रित नफा १,२९७ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीने गेल्या वर्षी याच तिमाहीत १२,५४७.७० कोटी रुपयांचा नफा कमावला होता. दरम्यान, विप्रो लिमिटेडचे शेअर्स सलग तिसऱ्या सत्रात तेजीत राहिले.

शेअर बाजारात तेजीचा वारू

दिवाळीनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजीचा वारू वेगाने दौडल्याने सेन्सेक्सने सोमवारी ६० हजारांवर उसळी घेतली होती. परिणामी, गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. सोमवारचा बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७८६ अंकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजारांतर्गत निफ्टीत २२५ अंकांनी वाढ झाली होती. सेन्सेक्समधील कालची वाढ ही १.३१ टक्के होती. सेन्सेक्स तब्बल ६० हजार ७४६ वर पोहोचला होता. निफ्टीत १.२७ टक्क्याची वाढ होऊन तो १८,०१२ अंकांवर धडकला होता. शेअर बाजारात एकूण १ हजार ७८८ शेअर्समध्ये वाढ झाली होती, तर १ हजार ६५७ शेअर्समध्ये घसरण झाली होती. (Stock Market)


हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news