मुंबई : नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा अपघात टळला | पुढारी

मुंबई : नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा अपघात टळला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनच्या रेल्वेमार्गावर टाकलेल्या रुळाचा लोखंडी तुकडा लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट यांच्या सतर्कमुळे बाजूला केल्याने मोठा अपघात टळला.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मिनी ट्रेनचे लोको पायलट दिनेश चंद मीना, सहाय्यक लोको पायलट सुधांशू पी. यांनी माथेरान ते नेरळ विभागात मिनी ट्रेन क्र. 52106 लोको चालवत होते. काही अज्ञात व्यक्तींनी रुळावर लोखंडी तुकडा टाकला असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा मिनी ट्रेनचे लोको पायलट दिनेश चंद मीना आणि सहाय्यक लोको पायलट सुधांशू पी. या दोघांनीही प्रसंगावधान दाखवून त्यांनी पुरेशा अंतरावर मीनी ट्रेनचे ब्रेक लावून काही अंतरावर ट्रेन थांबविली. त्यामुळे मोठ्या अपघात टळला.

मिनी ट्रेनचे लोको पायलट दिनेश चंद मीना आणि सहाय्यक लोको पायलट सुधांशू पी. यांचे त्यांच्या उल्लेखनीय
कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मिनी ट्रेनच्या रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाचा तुकडा कोणी ठेवला, यासंदर्भात मध्य रेल्वेकडून चौकशी केली जात आहे.

Back to top button