मुंबई : केदारनाथाचे संपूर्ण गर्भगृह सोन्याने मढविले! | पुढारी

मुंबई : केदारनाथाचे संपूर्ण गर्भगृह सोन्याने मढविले!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले 12 ज्योर्तिगांपैकी एक असलेले केदारनाथ मंदिराचे गर्भगृह संपूर्ण सोन्याने मढविण्यात आले असून बुधवारी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हे काम पूर्ण झाले. तमाम मराठी वाचकांनी या कामाची नोंद घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे सर्व सोने महाराष्ट्रातील एका अनाम दानशूराने दिले आहे.

या दानशूराचे नाव उघड करण्यात आलेले नाही.  किती सोने लागले त्याचा निश्चित आकडाही उघड झालेला नाही. मात्र हे संपूर्ण सोने दिल्लीहून केदारनाथला पोहोचले आणि पायथ्यापासून म्हणजे गौरीकुंडापासून ते केदारनाथ मंदिरापर्यंत सोन्याचे 550 पत्रे पोहोवण्यासाठी 18 घोडी लागली. भारतीय पुरातत्व विभागाच्या 2 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली 19 कारागीर गेला दीड महिना हे काम करत होते. बुधवारी ते पूर्ण झाले आता पुढील 6 महिने मंदिर बंद राहील.

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार दीड महिन्यांपूर्वी केदारनाथाच्या गर्भगृहाचे माप घेणे, सोन्यांचा पत्रा चढविण्यासाठी दगडी भिंतीची पूर्व तयारी करणे अशी कामे सुरू झाली. आठवड्यापूर्वी रुरकी येथील सेंट ?ल बिल्डि ?ग रिसर्च इन्स्टिट्यूटचे 6 सदस्यीय पथक ही दाखल झाले. या पथकाने पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्‍यांसमवेत गर्भगृहाची पाहणी केली आणि त्यानंतर केलेल्या शिफारशीनुसार सोनेरी पत्रे चढविण्यात आले.

सोने किती लागले ?

याप्रश्नाचे उत्तर उतरविलेल्या चांदीवरून शोधावे लागते. 2017 मध्ये केदारनाथ बाबाच्या गर्भगृहाच्या भिंती चांदीने मढवलेल्या होत्या. त्यासाठी सुमारे 230 किलो चांदी लागली. आता सोन्याचे पत्रे चढविण्यापूर्वी चांदीचे पत्रे आधी काढवी लागली. त्यानंतर मूळ भिंती स्वच्छ करण्यात आल्या. मग सोन्याचा आकार निश्चित करण्यासाठी पूर्ण गर्भगृहाला तांब्याचे पत्रे चढविण्यात आली त्यावरून सोन्याचे पत्रे चढविण्याचा अंतिम टप्पा पूर्ण करण्यात आला. आता चांदीने गर्भगृहाचा तितका भाग झाकलेला होता त्यापैकी अधिक भाग आता सोन्याने मढविण्यात आला आहे. गर्भगृहाचे चारही स्तंभ, शिवलिंगाच्या चोहोबाजूनी असलेल्या जल्हारी म्हणजे भिंती, छत्र, छत आणि गर्भगृहाच्या आतील सर्वत्र भिंती सोन्याने मढविण्यात आल्या आहेत.

श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले की, केदारनाथ बाबाचे गर्भगृह सोन्याने मढविण्यासाठी कारागीरांना व तज्ज्ञ अधिकार्‍यांना कमालीच्या प्रतिकूल वातावरणाच्या सामना करावा लागला. निसर्गाशी दोन हात करीत त्यांनी हे काम अत्यंत वेळेत पूर्ण केले. हिवाळ्यात बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी मंदिर बंद करावे लागले.त्यापूर्वी हे काम पूर्ण झाले.

Back to top button