Mumbai railway
Mumbai railway

मुंबई : रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या सुट्टीनंतर कामावर परतताना सकाळीच चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. अंबरनाथहून कर्जतकडे जाणारी लोकलसेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

S-3 सीएसएमटी- कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news