खासदार श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; शिंदे गट आणि मनसेची जवळीक वाढली, राजकीय चर्चांना उधाण | पुढारी

खासदार श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; शिंदे गट आणि मनसेची जवळीक वाढली, राजकीय चर्चांना उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवतीर्थावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे राज्यात महायुतीच्या चर्चेला उधाण आले असतानाच आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळत असली तरी विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

डोंबिवलीच्या फडके रोडवरील आप्पा दातार चौकात मनसेने रविवारी दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच ठिकाणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचादेखील कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमादरम्यान खासदार डॉ. शिंदे यांनी पहिल्यांदाच मनसेच्या मध्यवर्ती शाखेत भेट दिली होती. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही पक्ष प्रमुखांनी सांगितले युती करायची, ती देखील करायला आम्ही तयार आहोत. मात्र एक नक्की आहे की आमच्या सर्वांची मने जुळलेली आहेत, फक्त वरतून तारा जुळले की सर्व जुळून येईल, असे महायुतीबद्दल सूचक विधान केले होते. या विधानांमुळे राजकीय गणितांच्या चर्चांना उधाण आले असतानाच आज खासदार डॉ. शिंदे यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट घेतली. यामुळे मनसे-शिंदे गट-भाजप एकत्र येणार का? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा :

Back to top button