दिवाळीत मुंबई आणि पुण्यातील हवेच्या स्‍थितीत सुधारणा | पुढारी

दिवाळीत मुंबई आणि पुण्यातील हवेच्या स्‍थितीत सुधारणा

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा : दिवाळीच्या सुरुवातीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेच्या स्‍थितीत गेल्या काही वर्षांपासून सुधारणा दिसून येत आहे. मुंबई आणि पुण्यात सोमवारी हवेची स्थिती बऱ्याच अंशी चांगली दिसून आली. पुण्यात हवेचा दर्जा समाधानकारक दिसून आला. तर मुंबईतही हवेचा दर्जा थोडा खराब होता.

केंद्रीय पृथ्वी व विज्ञान संस्थेच्या पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रोपिकल मॅटिरिओलॉजी (आयआयटीएम) कडून सफर या प्रणालीच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेचा दर्जा मोजला गेला. त्यावेळी ही माहिती समोर आली. रात्री नऊ वाजता मुंबईत हवेचा दर्जा १०८ वर दिसून आला.

मुंबईतील विविध स्थानकांमध्ये अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वेगवेगळे आढळून आले. सर्वात जास्त अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण नवी मुंबईत नोंदवले गेले. नवी मुंबईत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ३०० तर त्याखालोखाल वांद्रे-कुर्ला संकुलात २०८ आणि मालाड येथे २०४ वर नोंदवले गेले. अंधेरी आणि चेंबूर येथे हवेचा दर्जा थोडा खराब होता. अंधेरीत अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा १९३ तर चेंबूरमध्ये १५६ वर दिसून आला.

हेही वाचा :  

Back to top button