उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी : उदय सामंत | पुढारी

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी : उदय सामंत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौर्‍यावर राज्याचे उद्योगमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे. प्रायव्हेट चार्टर्ड विमानाने औरंगाबाद, पुढे लक्झरी कारने शेतकर्‍यांच्या बांधावर जाणार्‍या ठाकरे यांनी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेला हा लक्झरीयस दौरा असल्याची टीका मंत्री सामंत यांनी रविवारी केली.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद दौरा केला. बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या या दौर्‍यावर उदय सामंत यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहून टीकास्त्र सोडले. सत्ता गेल्यानंतरचा शेतकर्‍यांसाठीचा हा ठाकरेंचा पहिलाच दौरा. ‘मातोश्री’बाहेर पडून आपल्या लक्झरी कारमध्ये बसून नंतर प्रायव्हेट चार्टर्ड विमानाने औरंगाबादला पोहोचतील. तिथून पुढे लक्झरी कारने शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांसोबत फोटोसेशन करतील. ठाकरेंच्या कानात खुसफुसणारे आणि कायम त्यांच्या मागे-पुढे नाचणारे ‘मातोश्री’वरचे बडवे या दौर्‍यात असतील. हे बडवे शेतकर्‍यांना ठाकरेंच्या जवळ येणे तर
सोडाच, बोलू देखील देणार नाहीत. स्वत…चे महत्त्व वाढवण्यासाठी शेतकर्‍यांच्या सगळ्या समस्या हे बडवेच ठाकरेंना सांगतील, अशी टीका सामंतांनी केली.

ठाकरे यांचे शेतकर्‍यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात, हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल. म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी तुमच्या दौर्‍याचे हे प्रवासवर्णन करत आहे, अशा शब्दांत सामंत यांनी
ठाकरेंच्या दौर्‍याचा समाचार घेतला. या लक्झरीयस इव्हेंटमध्येही स्वत…चा छंद जोपासत शेतकर्‍यांचे फोटो काढतील. त्यानंतर मुंबईत या फोटोचे प्रदर्शन भरवतील, सेलिब्रिटींना बोलावले जाईल. त्यानंतर ‘मातोश्री’वरील बडवे
शिवसेना नेत्यांना आणि शिवसैनिकांना प्रदर्शनातील फोटो हे बोली लावून खरेदी करण्याचे आदेश देतील, असा
आरोपही सामंत यांनी केला.

Back to top button