Cyber Crime : हातचालाखीने चोरट्यांनी एटीएममधून स्वतःच्याच खात्यावर डल्ला मारला, बँकेची लाखाला फसवणूक | पुढारी

Cyber Crime : हातचालाखीने चोरट्यांनी एटीएममधून स्वतःच्याच खात्यावर डल्ला मारला, बँकेची लाखाला फसवणूक

पुढारी ऑनलाइन डेस्क : Cyber Crime : हातचालाखी किंवा बोलबच्चन करून चोरट्यांनी लोकांजवळील रोख किंवा सोन्याचे दागिने पळविले असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या आहेत. किंवा चोरट्यांनी एटीएम फोडल्याच्या घटनाही तुम्ही ऐकल्या असतील. पण चोरट्यांनी हातचालाखीने एटीएममधील पैसे चोरल्याचे ऐकले आहे का? मुंबईमध्ये सध्या अशा 5 घटना उघडकीस आल्या आहेत. जिथे चोरट्यांनी तंत्रज्ञानातील त्रुटींचा फायदा घेत हातचालाखीने एटीएममधील पैसे चोरले आणि खात्यात मात्र नोंद झाली नाही. त्यामुळे बँकेची फसवणूक झाली. मुंबईत गोरेगाव, खार, भांडुप आणि मालाडसह वांद्र्यातील ही पाचवी घटना आहे.

Cyber Crime :  एका बँकेच्या वांद्रे शाखेने पोलिसांनी दोन जणांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणाचा छडा लावताना चोरट्यांनी पैसे कसे चोरले याचा उलगडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या व्यवस्थापकाने सांगितले की, त्यांचे एटीएम शाखेच्या बाहेर आहे आणि तो दररोज दुपारी पैसे काढतो आणि मशीनमधील शिल्लक एकूण लोड केलेल्या रकमेची गणना करतो. गेल्या शुक्रवारी एटीएममधून 20 हजार रुपये गायब झाल्याचे समजले. त्यांनी याबाबत आपल्या सहका-यांना सावध राहण्यासाठी सांगितले. मात्र, दुस-या दिवशी देखिल 80,000 रुपये गहाळ झाल्याचे आढळले.

cyber crime: ऑनलाईन फसवणूक, सायबर चोरांकडून ९ लाखांचा गंडा

Cyber Crime : त्यानंतर व्यवस्थापकाने आपले इलक्ट्रॉनिक जर्नल लॉग (विशिष्ट कालावधीत एटीएमवर केलेल्या सर्व व्यवहारांचा संग्रह) तपासले. त्यात बँकेची फसवणूक करून एटीएममधून पैसे चोरल्याचे स्पष्ट झाले. हे लक्षात येताच त्यांनी आपले सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये संबंधित वेळेला दोन व्यक्ति एटीएम किओस्कमध्ये प्रवेश करताना दिसले. त्यापैकी एकाने स्लॉटमध्ये कार्ड घालताना दिसत आहे. त्याने एटीएममध्ये पैसे काढले. मात्र, एटीएममधून जेव्हा नोटा बाहेर आल्या त्यावेळी त्याच्या सहका-याने मशिनच्या उजव्या बाजूचा मुख्य स्विच बंद केला. त्यामुळे पैसे तर बाहेर निघाले मात्र, स्विच बंद झाल्याने खात्यातून रक्कम डेबिट झालीच नाही. आणि अयशस्वी व्यवहार नोंदवला गेला. अशा प्रकारे दोघांनी मेन स्विच बंद करून खात्यातून एक लाख रुपये काढले.

पोलिसांनी व्यवस्थापनासोबत दोघांचेही खाते तपासून त्यांची ओळख पटवली. बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार सोहेल लियाकत आणि अस्लम खान दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघेही हरियाणाचे रहिवासी आहेत.

Cyber Crime : पोलिसांनी सांगितले की, हरियाणास्थित टोळ्या या मोड्स ऑपरेटिंगचा वापर करत आहेत. सप्टेंबरमध्ये भांडुप पोलिसांनी मेकॅनिकल इंजिनीअरसह दोन हरियाणा रहिवाशांना अडीच लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी अटक केली होती.

“प्रत्येक बँकेने त्यांचे एटीएम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआय आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. एटीएममध्ये फ्रीझिंग अॅप्लिकेशन्स स्थापित करणे आवश्यक आहे. जर कोणी एटीएमच्या पायाभूत सुविधांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर. दुर्दैवाने, काही बँका मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करत नाहीत आणि फसवणुकीला बळी पडत आहेत,” असे सायबर सुरक्षा तज्ज्ञ निखिल महाडेश्वर म्हणाले.

हे ही वाचा :

कोल्हापूर : गुप्तधन; महिलेच्या घरातून साहित्य जप्त

सायबर क्राईम घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी : Cyber Crime

Back to top button