Diwali Muhurat Trading 2022 | दिवाळीत लक्ष्मीपूजनाला एक तासासाठी खुला राहील शेअर बाजार, जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आणि महत्व | पुढारी

Diwali Muhurat Trading 2022 | दिवाळीत लक्ष्मीपूजनाला एक तासासाठी खुला राहील शेअर बाजार, जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आणि महत्व

Muhurat Trading 2022 : स्टॉक एक्स्चेंज बीएसई आणि एनएसईवर दिवाळीत एका तासाचे मुहूर्ताचे ट्रेडिंग (Diwali Muhurat Trading 2022) होते. यंदा दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. शेअर बाजाराच्या पंरपरेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजार एक तासासाठी खुला राहतो. हे एक तासाचे ट्रेडिंग शूभ मानले जाते. कारण हे संवत २०७९ सुरु होण्याचे प्रतिक आहे. ज्याचा अर्थ हिंदू धर्मशास्त्रात लेखा वर्ष आहे. या दिवशी व्यापारी वर्ग त्यांच्या व्यवसायातील वही पूजन करतात. दिवाळीत विशेष मुहूर्तावर केले जाणारे पूजन शुभ मानले जाते. या दिवशी बाजार नियमित वेळी खुला होत नाही. तर केवळ एक तासासाठी खुला राहतो.

स्टॉक एक्स्चेंजच्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी प्री- ओपन सत्र सायंकाळी ६ वाजता सुरु होईल आणि ६.०८ वाजता बंद होईल. तर मुहूर्त ट्रेडिंग सत्रात मॅचिंगची वेळ सायंकाळी ६.०८ ते ६.१५ वाजेपर्यंत असेल. दरम्यान, कॉल ऑक्शनमध्ये ट्रेड मॉडिफिकेशन सायंकाळी ७.४५ वाजता संपेल.

कमोडिटी डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मुहूर्त वेळ

कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग दिवाळी २०२२ चे सत्र सायंकाळी ६.१५ वाजता सुरु होईल आणि ७.१५ वाजता संपेल. दरम्यान, ट्रेड मॉडिफिकेशन सायंकाळी ७.२५ वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

करन्सी डेरिव्हेटिव्हची वेळ

करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये मुहूर्त ट्रेडिंगची वेळ सायंकाळी ६.१५ ते ७.१५ अशी आहे. क्रॉस करन्सी डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेंड मॉडिफिकेशनसाठी ७.२५ वाजेपर्यंत वेळ असेल. ट्रेंड रद्द करण्याची विनंती सायंकाळी ७.३० पर्यंत केली जाऊ शकते.

गुंतवणूकदारांना संधी

लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणूकदारांना समभागांमध्ये व्यवहार करण्याची संधी मिळावी यादृष्टीने गुंतवणूकदारांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली जाते. या दिवशी बहुतांश गुंतवणूकदार दुरच्या अवधीच्या (लाँगटर्म) हिशोबाने चांगल्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी करतात. तसेच काही समभागांच्या गुंतवणुकीमध्ये नफा असल्यास ट्रेडिंगच्या दरम्यान नफ्यातील काही भागाची विक्री करून लक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात नफा घरी आणतात.

काय आहे मुहूर्ताचे ट्रेडिंग? (Diwali Muhurat Trading 2022)

नवीन गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीची सुरूवात करण्यासाठी लक्ष्मी पूजनाचा दिवस एक चांगला मुहूर्त ठरू शकतो. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मी पूजनानिमित्तच्या मुहूर्ताच्या ट्रेडिंगमुळे गुंतवणूकदारांकडून चौफेर खरेदी केली जाते. मुहूर्त ट्रेडिंग दिवाळीत एक तासाचे असते. बीएसईवर १९५७ मध्ये आणि एनएसईवर १९९२ मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती.

हे ही वाचा :

Back to top button