नवी मुंबईत ई-वाहन खरेदीकडे वाढता कल

नवी मुंबईत ई-वाहन खरेदीकडे वाढता कल

नेरुळ; पुढारी वार्ताहर :  पारंपरिक इंधनात झालेली दरवाढ व महाराष्ट ? शासनाने जाहीर केलेले धोरण पाहता आता विद्युत वाहनांकडे खरेदीदारांचा कल वाढत आहे. 2021 जानेवारी ते 2022 ऑक्टोबर या कालावधीत 1571 वाहनांची नोंद नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयात झाली. यात 115 बस, 380 कार आणि 1154 दुचाकी ?चा समावेश आहे.

नवी मुंबईत तुर्भे येथे एक मोठे चार्जिंग केंद्र झाले असून नवी मुंबई महापालिका शहरात चार्जिंगचे जाळे उभारणार
आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहन चार्जिंगचा प्रश्नही सुटणार आहे. ही वाहने घरीही
चार्जिंग करता येत आहेत. त्यामुळे पुढील काळात यात मोठी वाढ होईल, अशी शक्यता आहे. त्यात नवी मुंबई
पालिकेचे सध्या नेरुळ येथील वंडर पार्क याठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्र सुरू आहे. याशिवाय इंधन दरवाढीमुळे तरुणाई विद्युत दुचाकी खरेदीकडे वळली असून त्यामुळे शून्य प्रदूषण होते.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात विद्युत बस दाखल झाल्या आहेत. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमकडे 180 विद्युत बस असून येत्या नवीन वर्षात आणखीन 15 विद्युत बस, डबल डेकर बसची भर पडणार आहे. दरम्यान, आमच्याकडे जानेवारी 2021 ते ऑक्टोबर2022 पर्यंत 1571 वाहनांची नोंद करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिले.

logo
Pudhari News
pudhari.news