Stock Market Today | सेन्सेक्स अकराशे अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना ३.३७ लाख कोटींचा फायदा

Stock Market Today | सेन्सेक्स अकराशे अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना ३.३७ लाख कोटींचा फायदा
Published on
Updated on

Stock Market Today : सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज शुक्रवारी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. आज सकाळी बाजार खुला होताच सेन्सेक्स तब्बल सुमारे १ हजार अंकांनी वाढून ५८,३०० च्या वर गेला. तर निफ्टी निर्देशांक सुमारे ३०० अंकांनी वाढून १७,३०० वर पोहोचला. त्यानंतर सेन्सेक्समधील तेजी १,१०० हून अधिक वाढली. सेन्सेक्स वधारल्याने गुंतवणूकादारांना ३.३७ लाख कोटींचा फायदा झाला आहे. यामुळे BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २६९.८५ लाख कोटींवरुन २७३.२३ लाख कोटींवर पोहोचले. सेन्सेक्समध्ये एचसीएल टेकचे शेअर्स सर्वाधिक ३.९५ टक्क्यांनी ‍वधारले. इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील सर्व ३० समभाग हिरव्या रंगात व्यवहार करत होते.

निफ्टीमध्ये इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्स यांचे शेअर्स वधारले. दरम्यान, भारतीय रुपया सावरत असून आधीच्या ८२.३५ च्या तुलनेत आज शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ८ पैशांनी वाढून ८२.२७ वर खुला झाला. भारतीय बाजाराप्रमाणे आशियाई शेअर बाजारही तेजी दिसून येत आहे. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक सकाळच्या सत्रात २.६७ टक्के म्हणजे ६९९.९० अंकांनी वाढून २६९३६ वर पोहोचला होता.

दरम्यान, कमकुवत जागतिक संकेत तसेच किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे काल गुरुवारी (दि.१३) शेअर बाजारात घसरण झाली होती. एक्सचेंज डेटानुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी १,६३६.४३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. पण आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे.

गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी घसरला होता. काल सेन्सेक्स ३९० अंकांच्या घसरणीसह ५७,२३५ वर बंद झाला. तर निफ्टी १०९ अंकांनी खाली येऊन १७,०१४ वर बंद झाला होता. एनएसई प्लॅटफॉर्मवर विप्रो, अदानी पोर्ट्स, एसबीआय, एल अँड टी आणि एसबीआय लाइफ या कंपन्यांचे शेअर्स ६.६३ टक्क्यांपर्यंत घसरले होते. तर एचसीएल टेक, हिंदाल्को, सन फार्मा, डॉ. रेड्डीज आणि एनटीपीसी यांचे शेअर्स वधारले होते.

गुरुवारच्या सेन्सेक्स घसरणीमुळे BSE सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप २६९.८५ लाख कोटी रुपयांवर घसरले होते. महागाई आणि वृद्धीच्या चिंतेमुळे बँकिंग, वित्त आणि भांडवली वस्तूंच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने गुरुवारी बाजारात घसरण दिसून आली होती.

क्रिप्टोकरन्सी तेजीत

आज शुक्रवारी सकाळी क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत पुन्हा तेजी दिसून आली आहे. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप २.७९ टक्क्यांनी वाढले आहे. सध्या क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ९४४.२४ अब्ज डॉलर आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news