मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर कार झाडावर आदळून दोघांचा मृत्यू | पुढारी

मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर कार झाडावर आदळून दोघांचा मृत्यू

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. जुनेद सलीम कुरेशी (26) आणि साहिल कुरेशी (18) अशी मृतांची नावे असून दोघेही कुर्ला, कसाईवाडा येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबरच्या रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कांजूर गाव बस स्टॉप जवळ (ईस्टन एक्सप्रेस हायवे उत्तरवाहिनी ) येथे इनोव्हा (MH 02 AL 5185) गाडी पिंपळाच्या झाडावर धडकली. या घटनेची माहिती नियंत्रण कक्ष, चेंबूर येथून कॉलद्वारे मिळाली. त्यनंतर घटनास्थळी मदतीसाठी विक्रोळी मोबाईल एक स्टाफ त्वरित जाऊन अपघातग्रस्त गाडीत बसलेल्या 9 इसमापैकी 8 जणांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर जखमींना त्वरीत भांडुप येथील फोर्टिस रुग्णालय आणि मुलुंड पूर्व येथील वीर सावरकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. जखमीपैकी चालक जुनेद सलीम कुरेशी (वय 26, रा. कसाईवाडा, कुर्ला) आणि साहिल कुरेशी (18, रा. कसाईवाडा, कुर्ला) हे मयत झाले आहेत. तसेच अयात आयान हाजीम कुरेशी (18) हा गंभीर जखमी असून सध्या त्याच्यावर भांडुपच्या फोर्टिस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. इतर सहा जण किरकोळ जखमी असून त्यांची प्रकृती ठीक असक्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Back to top button