मुंबई : कुलाबा ते नरिमन पॉईंटदरम्यान आणखी एक सागरी मार्ग

मुंबई : कुलाबा ते नरिमन पॉईंटदरम्यान आणखी एक सागरी मार्ग

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  वांद्रे – वरळी सीलिंक, शिवडी- न्हावा शेवा ट ?ान्स हार्बर लिंक या सागरी प्रकल्पापाठोपाठ आणखी
एका सागरी मार्गाची आखणी केली जात आहे. मुंबई बेटावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नरिमन पॉईंट ते कुलाब्या दरम्यान
आणखी एक सीलिंक बांधण्याची एमएमआरडीएची योजना आहे. 1.6 किमी लांबीच हा पूल चार मार्गिकांचा असेल. या ठिकाणी
जेट्टी, चालण्यासाठी- सायकलसाठी मार्गिका असेल.त्याशिवाय समुद्राचा नजारा पाहण्यासाठी गलरीही असेल. या प्रकल्पासाठी 284.55
कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

निविदा मंजूर झाल्यानंतर दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.नरिमन पॉईंट ते कुलाबा हे अंतर एक किलोमीटरचे असून गर्दीच्या वेळी हे अंतर कापण्यासाठी 20 मिनिटे खर्ची पडतात. त्यामुळे या भागात वाहतुकीची कायम गर्दी दिसून येते. नव्या पुलाच्या उभारणी नंतर हे अंतर पाच मिनिटात पार करणे शक्य होईल. सध्या या भागातून प्रवास करणारे वाहन चालक कॅप्टन
प्रकाश पेठे मार्ग, मादाम कामा रोड, मंत्रालय, फोर्ट असा प्रवास करतात. नेमक्या याच भागात वाहतूक कोंडी होते. या पुलाची कोस्टल
रोडलाही जोडणी दिली जाणार आहे. इस्टर्न फ्री वे, शिवडी न्हावा शेवा  ट ?ान्स हार्बर लिंक, शिवडी- वरळी कनेक्टर, वांद्रे- वरळी सीलिंकलाही हा पूल सहाय्यभूत ठरेल.

या प्रकल्पासाठी नेव्ही आणि कोस्ट गार्डची परवानगी आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्यावरणविषयक परवानगीही घ्यावी लागणार आहे.
या पुलामुळे मच्छीमारी करणार्‍या बोटींना कोणताही अडथळा होणार नाही, असा दावा केला जात आहे. समुद्र आणि पूल यामध्ये किमान
100 मीटरचे अंतर ठेवले जाणार असल्याने बोटींच्या वाहतुकीत अडचण येणार नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news