अर्थकारण : निर्देशांकांत भर | पुढारी

अर्थकारण : निर्देशांकांत भर

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गुरुवारच्या सत्रामध्ये भारतीय शेअर बाजारांवर काहीसे सकारात्मक वातावरण राहिले. दिवसअखेरीस दोन्ही
प्रमुख निर्देशांकांमध्ये बर्‍यापैकी भर पडलेली होती. येत्या काही दिवसांमध्ये अनेक कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर होणार आहेत. त्यापोटी बाजारात अनेक कंपन्यांमध्ये खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल आहे. परिणामी या सत्रात दोन्ही निर्देशांकात भर पडलेली होती.

आसीआयसीआय बँकसह इन्फोसिस, लार्सन, अ‍ॅक्सिस बँक व रिलायन्स या प्रमुख कंपन्यांमध्ये चांगली भाववाढ झाली. परिणामत: मुंबई शेअर निर्देशांकात 156.63 अंशांची तर निफ्टीमध्ये 57.50 अंशांची भर पडलेली होती. बाजारात एकूण वातावरण खूपच अनुकूल होते. या सत्रात मुंबई शेअर निर्देशांक 58 हजार 314.05 अंश पातळीवर खुला झाला. त्याने या सत्रात 58 हजार 578.76 अंशांची उच्चांकी पातळी नोंदवली. तर 58 हजार 173.70 अंशांची निचांकी गाठली. मात्र, कालच्या सत्राच्या तुलनेत त्यात 156.63 अंशांची वाढ होऊन तो अखेरीस 58 हजार 222.10 अंश पातळीवर बंद झालेला होता.

तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 प्रमुख कंपन्यांवर आधारलेला निफ्टी 17 हजार 379.25 अंश पातळीवर खुला झाला. त्याने 17 हजार 428.80 अंंशांची उच्चांकी तर 17 हजार 315.65 अंशांची निचांकी नोंदवली. कालच्या सत्राच्या तुलनेत अखेरीस त्यात 57.50 अंशांची
वाढ होऊन 17 हजार 331.80 अंश पातळीवर बंद झाला. या सत्रात अ गटात एकूण 710 कंपन्यांमध्ये व्यवहार झाले.

Back to top button