मुंबई : वरळी सी लिंकवर पाच वाहनांचा अपघात; ५ ठार, १० जखमी | पुढारी

मुंबई : वरळी सी लिंकवर पाच वाहनांचा अपघात; ५ ठार, १० जखमी

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा : मुंबईतील वरळी सी लिंकवर पोल क्रमांक ७६ ते ७८ च्या दरम्‍यान एक ॲम्‍ब्‍युलन्स आणि चार मोटारींचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ५ जणांचा मृत्‍यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमींना नायर रूग्‍णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी तपासून त्‍यातील ५ जणांना मृत घोषित केले.

दरम्‍यान, यातील २ पुरूष आणि १ महिलेला उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे, तर २ जण किरकोळ जखमी असल्‍याने उपचार करून त्‍यांना घरी सोडण्यात आले आहे. या अपघातात सी लिंक सिक्‍युरिटीचा एक कर्मचारी आणि इतर दोनजण जखमी झाल्‍याने त्‍यांना खासगी वाहनातून लीलावती रूग्‍णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा :  

Back to top button