Mohit Kamboj vs MVA : उद्धवजी पक्षाध्यक्ष आहेत पण... मोहित कंबोज यांचा मविआवर निशाणा | पुढारी

Mohit Kamboj vs MVA : उद्धवजी पक्षाध्यक्ष आहेत पण... मोहित कंबोज यांचा मविआवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  काँग्रेस पक्ष आहे, पण अध्यक्ष नाही!, उद्धवजी पक्षाध्यक्ष आहेत पण पक्ष नाही! आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) बघूया! असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट केले आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ट्विट करत चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहे. आजही त्यांनी ट्विट करत आघाडीवर (Mohit Kamboj vs MVA ) निशाणा साधला आहे.  मोहित कंबोज यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Mohit Kamboj vs MVA : शिवसेना कोणाची?

गेले काही दिवस कॉंग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे.  कोण होणार कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर एकीकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला नाट्यमयरित्या वळण मिळत गेले. भाजप – शिंदे गट अशी युती होत महाराष्ट्रात अखेर सत्ता स्थापन झाली. पण इथे हे राजकीय नाट्य संपले असे वाटत असताना दसरा मेळावा आणि शिवसेना पक्षचिन्हावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरु झाला. दसरा मेळावा कोण घेणार यात उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली. पालिकेने शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही नाकारल्यानंतर शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर  शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला हिरवा कंदील दाखवला.

Mohit Kamboj vs MVA : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) बघूया!

दसरा मेळावा ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. पण शिवसेना नेमकी कोणाची ठाकरे गटाची की, शिंदे गटाची हा वाद सुरु आहे. शिवसेना कोणाची असणार आणि पक्षचिन्हावर कोणत्या गटाचा अधिकार असणार यावरुन न्यायालयीन वाद सुरु झाला. आता या वादावर  केंद्रीय निवडणूक आयोग यावर निर्णय देणार आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते मोहित कंबोज  (Mohit Kamboj) यांनी एक ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, काँग्रेस पक्ष आहे, पण अध्यक्ष नाही!, उद्धवजी पक्षाध्यक्ष आहेत पण पक्ष नाही! आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) बघूया! मोहित कंबोज यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button