पाकिस्तान झिंदाबाद म्हणणार्‍यांना सोडणार नाही : देवेंद्र फडणवीस | पुढारी

पाकिस्तान झिंदाबाद म्हणणार्‍यांना सोडणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : ज्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला.

दहशतवादी आणि त्यांच्या देशविघातक कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए आणि ईडीने महाराष्ट्रातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. या विरोधात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केले. त्यावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍यांना सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. या संघटना देशविरोधी कारवाया करत आहेत. त्यासाठी कार्यक्रम या संघटना आयोजित करत असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, असे ते म्हणाले.

Back to top button