Stock Market Updates | कमकुवत जागतिक संकेतामुळे शेअर बाजारात पडझड, रुपयाची निचांकी घसरण | पुढारी

Stock Market Updates | कमकुवत जागतिक संकेतामुळे शेअर बाजारात पडझड, रुपयाची निचांकी घसरण

Stock Market Updates : जागतिक बाजारातील कमकुवत संकेतामुळे सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीचा आशियाई बाजारावर झालेला परिणामही कायम आहे. आज शुक्रवारी सकाळी भारतीय शेअर बाजार घसरणीसह खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरून ६० हजारांच्या खाली येऊन व्यवहार करत आहे. तर निफ्टी १५० अंकांनी खाली येऊन १७, ५०० च्या खाली येऊन व्यवहार करत आहे. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.२३ वर खुला झाला. रुपयाची ही झालेली घसरण आतापर्यंतची निचांकी आहे.

महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत कर्ज वसुलीसाठी थर्ड पाटी सेवा थांबवण्याचे निर्देश होते. त्याचा परिणाम महिंद्राच्या शेअर्सवर झाला आहे.

भारतासह इतर आशियाई समभागदेखील घसरले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीचा फटका वॉल स्ट्रीट निर्देशांकाला बसला आहे. हा निर्देशांक घसरला आहे. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button