अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला कोठडी | पुढारी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला कोठडी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : घरात कोणीही नसल्याची संधी साधून स्वतः च्याच दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्याशी तिच्यापित्यानेच अश्लील चाळे करुन लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना कांदिवलीत उघडकीस आली आहे.

कांदिवली पोलिसांनी विनयभांगसह लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नराधम पित्याला अटक केली आहे. त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी पिता मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करीत असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर जाधव यांनी दुजोरा दिला आहे. आरोपी हा त्याच्या पत्नीसह मुलांसोबत कांदिवली परिसरात राहतो. तो बिगारी कामगार असून मिळेल ते काम करत होता. अनेकदा त्याची पत्नी घरी नसताना तो त्याच्याच मुलीशी अश्लील चाळे करीत होता. तिला दम देऊन कपडे काढण्यास प्रवृत्त करीत होता. फेब्रुवारी 2020 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत त्याने अनेकदा मुलीवर अत्याचार केला होता. तिच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध 376 (2), (1), (एन), 354, 506 (2) भादवीसह 4, 10 पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

Back to top button